आमिर खानने "सत्यमेव जयते" मधून मेडिकल क्षेत्रातील त्रुटी जगासमोर आणल्या होत्या. त्यातला कळीचा मुद्दा होता डॉक्टरांकडून लिहून दिली जाणारी महागडी औषधे! या महाग औषधाच्या बद्ल्यात स्वस्तातील जेनेरिक औषधांचा पर्याय दिला होता.
प्रत्येक औषध, गोळी, कॅप्सूल याला एक जेनेरिक नाव असतं आणि ही औषधे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने (Brand) बनवून अमाप किमतीत विकत असतात. एकाच जेनेरिक नावाच्या सर्व ब्रॅंडच्या औषधांमधील पदार्थांचं प्रमाण आणि परिणाम एकच असतो. पण औषध कंपन्याच्या लागेबांधेमुळे स्वस्तातील औषधे मेडिकल स्टोअर मध्ये पोहचत नाही आणि डॉक्टर सुद्धा स्वस्तातील जेनेरिक औषधे लिहून देत नाही. उदाहरणार्थ, Metocard XL (50 mg) ह्या औषधाची किंमत ६२ रुपये आहे. हेच औषध Cipla कंपनीच्या Mepol या नावाने फक्त ७ रुपयांत मिळते.
ही जेनेरिक औषधे कशी शोधावी?!
१) www.medguideindia.com या वेबसाइटला भेट द्या.
२) 'Drugs' वर क्लिक करा.
३) 'Brand' वर क्लिक करा.
४) तुम्ही जे औषध वापरता त्याचं नाव टाईप करा (e.g Metocard XL (50 mg) आणि सर्च करा. तुम्हाला त्याचे जेनेरिक नाव मिळेल.
५) 'Generics' मध्ये जाऊन त्या जेनेरिक औषधाचे अनेक स्वस्तातील पर्याय मिळतील.
६) Google मध्ये आपल्या जवळचे जेनेरिक औषध मिळण्याचे स्टोअर सर्च करा आणि ही औषधे मिळवा.
किंवा तुम्ही सरळ जेनेरिक मेडिकल स्टोअरला भेट देऊन महाग औषधाला पर्यायी जेनेरिक औषध मागू शकता. वरील साईटचा उपयोग म्हणजे तुम्हाला खूप सारे जेनेरिक पर्याय मिळतील आणि तुम्ही सर्वात स्वस्तातील औषध शोधू शकता.
चला मग प्रयत्न करुया. डॉक्टर जेनेरिक होतील तेव्हा होतील पण तोपर्यंत आपण आपले Generic कम्पाँडर बनूया !
If you have any query regarding generic medicines, write it in comments or simply mail at mahabuddhist@gmail.com
उत्तर द्याहटवा