शनिवार, २८ जुलै, २०१८

अनापना ध्यान @ ग्लोबल विपश्यना पगोडा

ग्लोबल विपश्यना पगोडा मध्ये पर्यटकांसाठी १० मिनिटांचा अनापना ध्यान सुरू आहे.

वेळ - दररोज १० ते ७ अविरत!
         

ठिकाण- ग्लोबल विपश्यना पगोडा
       एस्सेल वर्ल्ड च्या बाजूला,
       गोराई विलेज,
       बोरीवली (पश्चिम),
       मुंबई- ४०००९१.

संपर्क-   +९१ २२ ३३७४७५०१, ०२२ २८४५१२०४/११७०

या अनुभुतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
सर्व उपासकांनी १० मिनिटे ध्यान सभागृह न सोडता बसून राहावे आणि ध्वनीफितीच्या सूचनांचे अनुसरण करावे.
ध्यानाच्या वेळी संपूर्ण शांतता ठेवावी आणि मोबाईल बंद ठेवावे.
      भ....भ....भ......भागमती !

        
                                
काही दिवसांपूर्वी बायकोसोबत अनुष्का शेट्टीचा तमिळ "भागामती" पाहिला. हो तीच बाहुबली मधली देवसेना. तर चित्रपटात भागमती नावाच्या राणीचं भूत नायिकेला झपाटत आणि ते अतिशय सुंदररीत्या अनुष्काने रंगवलय. काही दृश्य तर खरोखरच अंगावर काटा आणतात. पण शेवटी कळत हे सर्व नायिकेचं नाटक असतं तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आणि तीही आईएएस असूनही तिला या असल्या आत्मा भूत वगैरे मार्गाने जाणं कसं योग्य वाटत काय माहीत? 

पण प्रश्न माझा नाही. पूर्ण सस्पेंस चित्रपट एन्जॉय करणाऱ्या बायकोला शेवट झाल्यावर चित्रपट नाही आवडला. कारण काय तर ते भूत वगैरे खरं असायला हवं होतं, ते नसल्यामुळे सर्वी मज्जा गेली असं तिचं म्हणनं. नंतर पण काही लोकांनी हीच प्रतिक्रिया दिली.

कसयं ना आपल्याला देव भूत वगैरे या गोष्टींची एवढी सवय लागलीय की ज्या गोष्टींचं उत्तर नाही त्या गोष्टीला देव किंवा भूतचं कारणीभूत ही समज झालीयं. म्हणून तर नागिण, रात्रिसं खेळ चाले यांसारखे सीरियल आजही हमखास डिमांड मध्ये आहेत आणि लोकंही आवर्जून पाहतात. एक मनोरंजन म्हणून आपण काल्पनिक काहीही पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण स्पाइडरमन किंवा हैरी पॉटर सारखे सिनेमे पाहतो, पण आपण त्याला सत्य म्हणून स्वीकारत नाही.

इथे मात्र गावोगावी गल्लोगल्ली असणाऱ्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं. लोक त्या गोष्टीशी एकरूप व्हायला लागतात, त्या गोष्टींशी मिळत्याजुळत्या (किंवा मिळवून जुळवून) कहाण्या उकरल्या जातात, रंगवल्या जातात आणि हेच मुळी भयानक आहे. 

2 चा दूसरा घात 4, तिसरा घात 8, चौथा घात 16, आणि अनंतव्हा घात देव. ज्या गोष्टीचं उत्तर माहीत नाही त्याचं उत्तर राम जाने. (किमान जोपर्यंत शास्त्रज्ञ शोधून काढत नाही तोपर्यंत तरी देवचं)!

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१२

फ़िजा चित्रपटातील डायलॉग- सत्यवचन

 केसरिया रंग और हरा रंग भारत के झंडे के दो हिस्से है, उन्हे हिस्सा ही बना रहना चाहिये, पूरा झंडा बनने की कोशिश नही करनी चाहिये...!

सोमवार, १० सप्टेंबर, २०१२

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरात चोख व्यवस्था!

नागपूर : येत्या 22 ते 25 ऑक्टोबरपर्यंत दीक्षाभूमी येथे 56 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा  साजरा होत आहे. त्या निमित्त्ताने जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, वीज वितरण विभाग यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही चोख व्यवस्था ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.
                                                                                                       सौजन्य: महान्यूज

बचत भवन सभागृहात 56 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सौरभ राव होते. या बैठकीस नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव ई. झेड. खोब्रागडे  हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राव म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा 23 व 24 ऑक्टोबर रोजी होणार असून या सोहळ्यात यावर्षी देशातून तसेच विदर्भ, मराठवाड्यातून 10 लाख भाविक उपस्थित राहतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागपूर महानगरपालिके तर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था तसेच पाऊस आल्यास भाविकांना आश्रयासाठी शाळांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पोलिस विभागातर्फे सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहील. सोबतच डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील एन.सी.सी व एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांची मदत पोलिसांना होणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सी.सी.टीव्ही लावण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 7 मार्च 2005 च्या निर्देशानुसार 21 मुद्यांवर संपूर्ण आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. दीक्षाभूमी परिसरात दुकानदारांनी सिलेंडर, स्टोव्ह, लाऊडस्पिकर आणू नये अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या वेळी एक दोन दिवस आधी विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या अन्नदाना संदर्भात विशेष काळजी घ्यावी. अन्न व औषधी प्रशासनाने अन्न पदार्थांचे नमुने तपासावे, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेचे आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य सेवा उपसंचालक यांनी संयुक्त रित्या बैठक घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच खाजगी रुग्णालयांत वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबत चार मोबाईल आरोग्य रुग्णवाहिका तसेच तातडीची औषधे उपलब्ध ठेवावी, असेही  बैठकीत संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.

वर्षातील महत्वाचे दिवस!

३ जानेवारी - सावित्रीबाई फुले जन्मदिन
२७ फेब्रुवारी- मराठी राजभाषा दिन
१० मार्च - संत तुकाराम महाराज बीज
१० मार्च- सावित्रीबाई फुले पुण्यदिन
११ एप्रिल - महात्मा फुले जयंती
१४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
६ मे - राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी
१० मे - संत चोखामेळा पुण्यतिथी, मंगळ्वेढा
 २६ जून - राजर्षी शाहू महाराज जयंती
२८ नोव्हेंबर- महात्मा फुले पुण्यतिथी
६ डिसेंबर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

जय भीम- कविता १

साकाळलेल्या रक्ताला खवळून
क्रांती तू घडवली
जनावराचं जीवन जगणाऱ्यांची
माणसं तू बनवली

सवर्णांच्या लाथा खाऊनही
पायाशी त्यांच्या घुटमळत होतो
पुढच्याची ठेस पाहूनही
शहाणे मात्र होत नव्हतो

अशा अन्यायाच्या चिखलातच
भीम नावाचा कमळ फुलला
चिरकालीन विचारांच्या सुगंधाने
बहुजनांच्य्या जीवनात दरवळला

वरवंटा झालेल्या दगडातून
मूर्ती तू साकारली
अस्मितेची जाण करवून
तिला सजीव तू केली

कधी न पाहिलेल्या देवानेच
आमच्यावर अन्याय केला
उद्धार करुन आमचा भीमा तू
देवस्थानी पोहोचला
               
        -किरण सोनावणे
        mahabuddhist@gmail.com

आता औषधे मिळवा स्वस्तात! Go Generic!


मिर खानने "सत्यमेव जयते"  मधून मेडिकल क्षेत्रातील त्रुटी जगासमोर आणल्या होत्या. त्यातला कळीचा मुद्दा होता डॉक्टरांकडून लिहून दिली जाणारी महागडी औषधे! या महाग औषधाच्या बद्ल्यात स्वस्तातील जेनेरिक औषधांचा पर्याय दिला होता.

प्रत्येक औषध, गोळी, कॅप्सूल याला एक जेनेरिक नाव असतं आणि ही औषधे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने (Brand) बनवून अमाप किमतीत विकत असतात. एकाच जेनेरिक नावाच्या सर्व ब्रॅंडच्या औषधांमधील पदार्थांचं प्रमाण आणि परिणाम एकच असतो. पण औषध कंपन्याच्या लागेबांधेमुळे स्वस्तातील औषधे मेडिकल स्टोअर मध्ये पोहचत नाही आणि डॉक्टर सुद्धा स्वस्तातील जेनेरिक औषधे लिहून देत नाही. उदाहरणार्थ, Metocard XL (50 mg) ह्या औषधाची किंमत ६२ रुपये आहे. हेच औषध Cipla कंपनीच्या Mepol या नावाने फक्त ७ रुपयांत मिळते.

ही जेनेरिक औषधे कशी शोधावी?!
१) www.medguideindia.com या वेबसाइटला भेट द्या.
२) 'Drugs' वर क्लिक करा.
३) 'Brand' वर क्लिक करा.
४) तुम्ही जे औषध वापरता त्याचं नाव टाईप करा (e.g Metocard XL (50 mg) आणि सर्च करा. तुम्हाला त्याचे जेनेरिक नाव मिळेल.
५) 'Generics' मध्ये जाऊन त्या जेनेरिक औषधाचे अनेक स्वस्तातील पर्याय मिळतील.
६)  Google मध्ये आपल्या जवळचे जेनेरिक औषध मिळण्याचे स्टोअर सर्च करा आणि ही औषधे मिळवा.
     
           किंवा तुम्ही सरळ जेनेरिक मेडिकल स्टोअरला भेट देऊन महाग औषधाला पर्यायी जेनेरिक औषध मागू शकता. वरील साईटचा उपयोग म्हणजे तुम्हाला खूप सारे जेनेरिक पर्याय मिळतील आणि तुम्ही सर्वात स्वस्तातील औषध शोधू शकता.
           चला मग प्रयत्न करुया. डॉक्टर जेनेरिक होतील तेव्हा होतील पण तोपर्यंत आपण आपले Generic कम्पाँडर बनूया !